मराठा आरक्षणासाठी सर्वांना एकत्र यावंच लागेल : संभाजीराजे

सोमवार, 28 सप्टेंबर 2020 (08:43 IST)
मराठा आरक्षणासाठी सर्वांना एकत्र यावंच लागेल असे मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केल आहे. सातारा, कोल्हापूर छत्रपती एकत्रच आहेत असे सांगत नेतृत्व महत्वाचे नसून मराठा आरक्षणासाठी लढा अधिक तीव्र करावा लागणार आहे ही शेवटची लढाई आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यावे लागेल असे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व आणि आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व संभाजी महाराज यांनी करावं असा  ठराव नाशिकच्या बैठकीत झाला. त्यावेळी संभाजीराजे बोलत होते. 
 
संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झालेला नाही. मॅनेज झाला तर छत्रपतींचा वंशज म्हणून घेण्याची लायकी नाही, अशी रोखठोक भूमिका मांडली. छत्रपती संभाजी म्हणून नाही तर मराठा समाजाचा सेवक म्हणून इथे आलोय. कुटुंबप्रमुख म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. नेतृत्व करण्याचं मी नम्रपणे टाळतो, पण शेवटपर्यंत लढाई लढणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून मी तुमच्यासोबत राहणार, असं संभाजीराजे म्हणाले.
राज्यसभेत मराठा समाजाचे नेते बोलत नव्हते. मराठा समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय. संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झालेला नाही. मॅनेज झाला तर छत्रपतींचा वंशज म्हणून घेण्याची लायकी नाही. अंगावर पहिला वार माझ्यावर होऊ दे. गोळीचा होऊ दे की तलवारीचा होऊ दे. संभाजी छत्रपती ही मोहीम घ्या, असं सांगा, मी समाजाचा सेवक म्हणून मी जाईल, असं संभाजीराजेंनी यावेळी सांगितलं. दुसरीकडे मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून योग्य समन्वय साधला जात नसल्याची टीका त्यांनी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती