राज्यात महायुतीच सरकार येणार : उद्धव ठाकरे

बुधवार, 25 सप्टेंबर 2019 (15:26 IST)
राज्यातील आगामी निवडणूक आम्ही जिंकणारच, राज्यात महायुतीच सरकार येणार असा विश्वास यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यामुळे विधानसभेसाठी शिवसेना -भाजपा युती होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. अण्णासाहेब पाटील यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त व माथाडी कायद्याला ५० वर्षे पुर्ण झाल्या निमित्त नवी मुंबई येथे आयोजित मेळव्याला दोन्ही नेत्यांची  प्रमुख उपस्थिती होती.
 
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, माथडी कामगारांच्या व्यासपीठावर कोणताही राजकीय पक्ष ढवळाढवळ करणार नाही. चळवळीला ५० वर्षे पुर्ण झाली आहेत, यापुढेही असेच कार्य सुरू ठेवा. चळवळीतील अडचणी आम्ही दूर करू. माथाडी कामगारांच्या मुलांसाठी सरकार निश्चितच मदत करेल. तसेच, मराठा आरक्षणाच्या चळवळीला पाठिंबा देऊन  सरकारने अण्णासाहेबांना मानवंदना दिली असल्याचेही  सांगितले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती