आचारसंहिता लागू झाल्यानंतर विद्यमान आमदार आणि काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार प्रणिती शिंदे आणि त्यांच्या दोन महिला कार्यकर्त्यांनी व्यंकटेश्वरनगर परिसरामध्ये जाऊन महिला मतदारांना सौंदर्य प्रसाधनांचे बॉक्स वाटल्याचा आरोप नरसय्या आडम यांनी केला. वाटलेल्या पत्रकांवर विधानसभा सदस्य प्रणिती शिंदे यांचे फोटो असल्याचा आरोप करत नरसय्या आडम यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार दिली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीत तथ्य आढळल्यामुळे पोलिसांनी गुन्हा केला आहे.