विजयदुर्ग किल्ला

बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 (11:22 IST)
विजयदुर्ग, सिंधुदुर्ग सर्वात जुना किल्ला आहे. हा एक सुंदर आणि अभेद्य समुद्री किल्ला आहे. विजयदुर्ग ही छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वोत्कृष्ट विजय मानली जाते. इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा झेंडा फडकावला. 
 
या किल्ल्याचा वापर मराठा युद्धनौकेत अँकर म्हणून वापरायचे. कारण हा किल्ला वाघोटन क्रीक ने घेरलेला आहे. ह्या किल्ल्याला पूर्वी 'घेरिया' म्हणून ओळखले जात असे. नंतर 1653 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्याला आपल्या ताब्यात घेतल्यावर ह्याचे नाव विजयदुर्ग असे ठरवण्यात आले. 
 
हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या दोन किल्यांपैकी एक आहे ज्यावर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा ध्वज फडकाविला होता, तसेच दुसऱ्या किल्ल्याचे नाव तोरणा आहे.

कसं जावं- 
सडक मार्गे -
एसटी बसने नियमितपणे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातून विजयदुर्ग कडे जातात आणि सहजपणे मुंबई -गोवा राष्ट्रीय राजमार्गातून विजयदुर्ग जाऊ शकतो.मुंबईपासून सुमारे 440 किमी,पणजी पासून सुमारे 180 किमी आणि कासर्डेपासून सुमारे 60 किमी च्या अंतरावर आहे.
 
रेल्वे मार्गे- 
राजापूर मार्गे सुमारे (63 किमी अंतरावर)विजय दुर्ग पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे रेलवे स्टेशन आहे. कणकवली गडावर जाण्यासाठी हे वैकल्पिक रेलवे स्थानक आहे. हे कोंकण रेलवे मार्गावर आहे आणि किल्ल्यापासून सुमारे 80 किमी अंतरावर आहे.   
राजापूर आणि कणकवली ला जाणाऱ्या सर्व गाड्या या दोन्ही स्थानकावर थांबतात. स्थानकापासून सहजपणे खाजगी वाहन घेऊन जाऊ शकता.
 
विमान मार्गाने- 
किल्ल्या पर्यंत पोहोचण्यासाठी रत्नागिरी विमानतळे सर्वात जवळचे विमानतळे आहेत. इथून कमी विमान आहे या साठी पर्यायी म्हणून कोल्हापूर विमानतळ 150 किमी आणि दाबोलीयम विमानतळ सुमारे 210 किमी अंतरावर आहे आणि .
 
प्रेक्षणीय स्थळे- 
हा किल्ला मजबूत प्राचीन वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे.हा किल्ला शिलाहार वंशातील राजा भोज याने बांधला होता. या किल्ल्याचे बांधकाम 1193 ते 1205 च्या दरम्यान झाले. 
 
* लेण्या-
या विजयदुर्ग किल्ल्यामध्ये काही गुहांची संरचना अस्तित्वात आहे.हा किल्ला काही वर्षांपासून समुद्राने व्यापलेला आहे.ह्याला बघून अरबी समुद्राचे नेत्रदीपक दृश्य बघितल्यासारखे वाटते. 
 
* एस्केनल बोगदा-
आणीबाणीच्या वेळी इथे 200 मीटर लांबीचा बोगदा होता. या बोगद्याचा एक टोक गावातील घुळपच्या राजवाड्यात होता.
 
* तलाव -
इथे एक मोठे तलाव आहे जे किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांसाठी गोड पाण्याचा मुख्य स्रोत होता. 
 
* तोफगोळे -
काही जुने तोफेचे गोळे आज देखील किल्ल्यात ठेवले आहेत. आज देखील आपण किल्ल्याच्या भिंतीवरील त्या तोफेच्या गोळ्यांचे डाग बघू शकता. 
 
* भिंती -
हा किल्ला तीन भिंतीचा असून एक मोठा गड आहे. या मध्ये एकूण 27 बुरूज आहे. या गडाचे क्षेत्रफळ सुमारे 17 एकर आहे. सर्व वस्तू बघण्यासाठी सुमारे 3 तास लागतात. भिंती मोठ्या काळ्या खडकांच्या बनलेल्या आहेत. किल्ल्याच्या भिंती सुमारे 8 ते 10 मीटर उंच आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती