जितेंद्र आव्हाड दिसतील, तिथे त्यांची जीभ छाटावी

सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (21:04 IST)
जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. अफजलखान आणि शायिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत, असं विधान जितेंद्र आव्हाडांनी केलं होतं. त्याविरोधात भाजपाच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. अशातच जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाऱ्यास 10 लाखांच्या बक्षीसाची वादग्रस्त घोषणा करण्यात आली आहे.
 
जालन्यात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जितेंद्र आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपा ओबीसी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी म्हटलं की, “महाराष्ट्रातील जनतेला आवाहन आहे की, जितेंद्र आव्हाड दिसतील, तिथे त्यांची जीभ छाटावी. जो जीभ छाटेल १० लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येईल,” अशी घोषणा कपिल दहेकर यांनी केली.
 
मुंबईत भाजपा-राष्ट्रवादी कार्यकर्ते आमने-सामने
भाजपा युवा मोर्चाने जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. पण, पोलिसांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना रोखत ताब्यात घेतलं. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर भाजपाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती