महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून महायुतीचा दारुण पराभव झाल्यावर वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विजयासाठी महायुतीने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मध्यप्रदेशातील शिवराज सिंह चौहान यांच्या यशस्वी रणनीती प्रमाणे महायुती सरकारने ही शेतकरी आणि महिलांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजनांची घोषणा केली आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी महिला, तरुण आणि शेतकरी यांच्यावर केंद्रित असलेला अर्थसंकल्प सादर केला, ज्याचा फॉर्म्युला शिवराजसिंह चौहान यांना मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत जिंकण्यात मदत करणारा फॉर्म्युला साकारण्याचा उद्देश आहे. मार्च 2023 मध्ये मध्य प्रदेशात सुरू करण्यात आलेल्या 'लाडली बहन योजनेपासून प्रेरित होऊन राज्य सरकारने देखील असा उपक्रम सुरु केला आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील आर्थिकदृष्टया वंचित महिलांना दरमहा 1500 रुपये देणार.
शेतकऱ्यांसाठी देखील सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पंपाचे वीजबिल माफ केले जाणार. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी ज्यांना त्यांच्या मालाला अपेक्षित भाव मिळाला नाही, त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. दोन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये सरकार देणार आहे. याशिवाय, कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी 108 रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना मंजुरी आणि सुरू करण्याचा बजेटमध्ये समावेश आहे.