महाराष्ट्र विधानसभा निवडणूक या वर्षाच्या अखेरीस होणार असून सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. मुंबईत सोमवारी मनसेची कोअर ग्रुपची बैठक झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. राज्यातील सर्व विधानसभा जागेचे सर्वेक्षण मनसेकडून केले जात आहे. आता पर्यंत 88 जागांचे सर्वेक्षण केल्याचे अहवालात आले आहे. या 88 जागांसाठी संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित करण्यात येत आहे.
यंदा निवडणूक एकट्याने लढवायची की महायुतीसोबत युती करायची हा मुद्दा देखील चर्चेला आहे. पुढच्या महिन्यापासून राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. त्यांच्या मुलगा अमित ठाकरे देखील आता राजकारणात प्रवेश करणार असून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खास एंट्री करणार आहे. निवडणुकीच्या पक्षाच्या प्रचारात अमित ठाकरे महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
पक्षाच्या कोअरग्रुपच्या बैठकीबाबत मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, आज आमच्या पक्षाची बैठक होती. या बैठकीत निवडणुकीच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत प्रत्येकाला अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहे.त्यावर चर्चा पुढे केली जाईल.