मनसेने भाजपकडे राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी 20 जागांची मागणी केली

बुधवार, 12 जून 2024 (17:20 IST)
लोकसभा निवडणुकत मनसेने महाराष्ट्रातील महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला.आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी मनसेने भाजपकडे 20 जागांची मागणी केली आहे. संभाव्य जागावाटपाबाबत भाजपशी बोलणी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार, मनसेने बहुतांश जागांवर मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील जागा असल्याचा दावा केला आहे. या जागांमध्ये दादर-माहीम, वरळी, शिवडी, दिंडोशी, मागाठाणे, कल्याण ग्रामीण, भिवंडी ग्रामीण, जोगेश्वरी, घाटकोपर पश्चिम, चेंबूर, वर्सोवा, नाशिक पूर्व , वणी, पंढरपूर, औरंगाबाद मध्य,  आणि पुण्यातील एक जागा आहे. 

यंदा मनसे वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तर नितीन सरदेसाई दादर-माहीम येथून तर शालिनी ठाकरे वर्सोवातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.  
 
यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरु केली असून आव्हाने आणि उणिवा ओळखून त्यासाठी रणनीती आखण्यासाठी राज्यात भाजपने आपल्या जिल्हा शाखा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक 14 जून रोजी बोलावली आहे. राज्यात विधानसभा निवडणूक या वर्षाच्या अखेरीस होणार आहे.  
 
Edited By - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती