महाराष्ट्राचा अर्थसंकल्प : अजित पवारांकडून 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'ची घोषणा, महिन्याला दीड हजार रुपये मिळणार

शुक्रवार, 28 जून 2024 (14:18 IST)
अर्थमंत्री अजित पवार महाराष्ट्राच्या विधानसभेत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करत आहेत.
 
महायुती सरकारच्या या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. तसंच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प सादर होत आहे.
 
लोकसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला आलेल्या अपयशानंतर विधानसभेसाठी महायुतीसमोर मोठं आव्हान असताना अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्यातील महिला,शेतकरी, तरुण अशा विविध समाज घटकांना खूष करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.
 
अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे-
पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री व्यवस्थापन, निर्मल वारीसाठी 36 कोटी रुपये वितरित
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करत आहोत. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी 21-60 वयोगटातील महिलांना दर महिना दीड हजार रुपये दिले जातील. जुलै 2024 पासून ही योजना सुरू करणार असून, यासाठी 46 कोटी रुपये मंजूर करण्यात येत आहेत.
मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री लाडकी बेहना या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा
स्वयंपाकातील इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो. गॅस सिलेंडर घराला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातील.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती