अभिनेत्री हिना खानला झाला ब्रेस्ट कँसर

शुक्रवार, 28 जून 2024 (14:13 IST)
प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानला घेऊन एक बातमी वर आली आहे. हिना खानला कँसर झाला आहे. तसेच उपचारांसाठी त्या रुग्णालयामध्ये दाखल आहे. हिना खानला ब्रेस्ट कँसर झाला असून आता कँसर तिसऱ्या स्टेजवर गेला आहे. याची माहिती स्वतः हिना खान यांनी दिली आहे. 
 
हिना खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. यामध्ये सांगितले आहे की, त्या रुग्णालयात भरती आहे व त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 
 
हिना खान यांनी लिहले की, हॅलो एवरीवन सध्या फिरत असलेल्या अफवांना संबोधित करीत मी एक महत्वाची बातमी शेयर करीत आहे. जे माझ्यावर प्रेम करतात ते माझी काजळी घेतात. मला ब्रेस्ट कँसर झाला असून तो आता तिसऱ्या स्टेजला आहे. तसेच त्या म्हणाल्या की, मी आता ठीक आहे. हिना म्हणाल्या की, मी या आजाराशी खंबीर होऊन लढत आहे. माझ्यावर उपचार सुरु झाले आहेत. 
 
हिना खान यांनी त्यांच्या करियरची सुरवात टीव्ही शो 'ये रिश्ता क्या केहलता हैं' मधून केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक शो केलेत तसेच  चित्रपटामध्ये देखील त्या दिसल्या आहेत.   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती