बीड: भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू

शनिवार, 30 ऑगस्ट 2025 (11:42 IST)
बीड जिल्ह्यातील सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर भरधाव येणाऱ्या कंटेनरने सहा पादचाऱ्यांना चिरडले. त्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
ALSO READ: जळगाव एपीएमसीवर उद्धव गटाचा ताबा, महाविकास आघाडीचा मोठा विजय
सदर अपघात बीड शहराजवळ नामलगाव फाटा येथे उडाणपुलाजवळ सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला.तर दोघे जखमी झाले. 
ALSO READ: निवडणूक चिन्हाचा निर्णय , उद्धव गटाच्या बाजूने लागण्याचा दावा, मुंबईत पोस्टर लावले
जखमींना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, मृत आणि जखमी पेंडगाव दर्शनासाठी जात होते. मात्र, मृत आणि जखमींची अद्याप ओळख पटलेली नाही.या अपघातांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कंटेनर चालकाला ताब्यात घेतले.
Edited By - Priya Dixit
ALSO READ: आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत मैदान सोडणार नाही, मनोज जरांगे यांची घोषणा

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती