Refresh

This website p-marathi.webdunia.com/article/looksabha-election-2014-news/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80-114030800006_1.html is currently offline. Cloudflare's Always Online™ shows a snapshot of this web page from the Internet Archive's Wayback Machine. To check for the live version, click Refresh.

सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार मोदींची लोकप्रियता घटली

शनिवार, 8 मार्च 2014 (15:15 IST)
नुकत्याच झालेल्या एका वृत्तवाहिनीच्या सर्वेक्षणातून समोर आलेल्या अहवालानुसार लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसा मतदारांचा कल बदलू लागला आहे, असे चित्र  भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा प्रभाव थोडा कमी झाला असला तरी एनडीएची आघाडी कायम असल्याचे या सर्वेक्षणातील आकडेवारीतून स्पष्ट दिसते आहे. 
 
सीएनएन-आयबीएनने सहा राज्यांत केलेल्या सव्र्हेक्षणानुसार एनडीएला २१२ ते २३२ जागा मिळू शकतात. यामध्ये एकट्या भाजपला १९३ ते २१३ जागा मिळण्याची शक्यता आहे तर ११९ ते १३९ जागा घेत यूपीएला दुसरे स्थान मिळू शकते. यामध्ये काँग्रेसला ९४ ते ११० जागा मिळण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि दिल्ली अशा सहा राज्यांमध्ये सीएसडीएस आणि लोकनीतीने माहिती विविध प्रश्नांवर मतदारांचा कौल जाणून घेतला. एनडीए आणि यूपीएला मिळणा-या जागांच्या आकडेवारीकडे पाहाता जानेवारी महिन्यात झालेल्या सव्र्हेक्षणाइतक्याच जागा थोड्याफार फरकाने मिळतील, असे फेब्रुवारीच्या सव्र्हेक्षणातून समोर आले आहे. मात्र नरेंद्र मोदींच्या नावाची लाट ओसरत चालल्याचे समोर आले आहे. 
 
जानेवारी महिन्याच्या आकडेवारीनुसार ३६ टक्के लोक मोदींना पंतप्रधानपदासाठी पसंती देत होते. मात्र फेब्रुवारी महिन्यातील सव्र्हेक्षणानुसार ३१ टक्के लोक मोदींना पंतप्रधानपदासाठी पसंती देत आहेत. केवळ एका महिन्यात पाच टक्क्यांनी झालेली घसरण ही व्यक्तिगत मोदींसाठी धोक्याची घंटा आहे. कारण निवडणुकीसाठी अद्याप दीड एक महिना आहे आणि मोदींची लोकप्रियता अशीच कमी होत राहिली तर पक्षातूनच मोदींना मोठा विरोध निर्माण होऊ शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावाला पंतप्रधानपदासाठी पसंती वाढू लागली आहे. सध्या १३ टक्के लोक त्यांना पंतप्रधानपदासाठी पसंती देत आहेत. एक महिन्यात ही टक्केवारी वाढू शकते. सोनिया गांधी, मायावती, मुलायमसिंग आणि मनमोहनसिंग यांच्या नावांनाही पंतप्रधानपदासाठी पसंती वाढू लागली आहे. असे असले तरी भाजपलाच देशातील जनता मोठ्या प्रमाणावर मतदान करेल, अशी आकडेवारी सांगते. भाजपला ३३ टक्के लोकांची पसंती मिळाली आहे तर काँग्रेसला केवळ २६ टक्के जनता पाठिंबा देत असल्याचे सव्र्हेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे. 

वेबदुनिया वर वाचा