ते माझ्यावर टीका करतात कारण त्यांच्याकडे करायला काहीच नाही. मी कितीवेळा दौंडमध्ये आले. तुम्ही कितीवेळा दौंड मध्ये आला आहात. मी दौंडला महिन्यातून एकदा तरी येते मला दौंडच्या नागरिकांचे आभार मानते मला तीनवेळा संसदेत जाण्याची संधी इथूनच दिली आहे. मी पक्ष बदलेला नाही मात्र माझ्या पक्षाचं चिन्ह बदललं आहे. माझ्या वर टीका करतात की भाषणाने विकास होत नाही. पण मी म्हणते की भाषण केल्यानेच विकास होतो. कारण ही लोकशाही आहे. संसदे पर्यंत तुमचा आवाज पोहोचवण्यासाठी मी भाषण करते.
दौंडमध्ये सध्या दमदाटी सुरु आहे. पाणी बंद होईल अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहे. हे पाणी तुमच्या घरच नाही. कॅनल देखील तुमच्या घरचे नाही. हे पाणी माझ्या शेतकऱ्यांचं आहे. मी पण बघते कुणीच माई का लाल हे पाणी बंद करू शकत नाही. ऊस कोण अडवतो तेच बघते. उसात गडबडी झाली तर तुमच्यासाठी मी आंदोलन देखील करेन हा माझा शब्द आहे. असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना नाव न घेता टोला लगावला आहे.