आठवलेंची कविता सभेत व्हायरल

गुरूवार, 2 मे 2024 (12:51 IST)
पुण्यातील सभेमध्ये बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांना भटकती आत्मा टीकास्त्र सोडले होते. या टीकेला जोरदार उत्तर शरद पवार यांच्यासह विरोधकांनीही देखील दिले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हाच पॉईंट पकडून यावर कविता केली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, मी दिल्लीत रोज शरद पवार यांना भेटतो. तसेच ते म्हणाले की, आमचे दोघांचे पक्ष जरी वेगळे असतील तरी आमच्या मध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. 
 
रामदास आठवले यांनी "नरेंद्र मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा....कारण आम्हाला महाविकास आघाडीचा करायचा आहे खात्मा, अशी कविता केली आहे. देशभर नरेंद्र मोदी यांचा आत्मा भटकत आहे. तसेच ते म्हणाले की, लोकशाही धोक्यात आली असते तर मत मागायला आले असते का?? या देशामध्ये ज्याला संविधान मान्य त्यांनाच इथे राहण्याचा अधिकार आहे. मग तर इतरांना सर्वांना चाले जावचा नारा द्यावा लागेल. 
 
तसेच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना फक्त आरोप करण्यासाठी ठेवले असून, उद्धव ठाकरे ज्या वेळेस 
मुख्यमंत्री बनले होते तेव्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवायला पाहिजे होते. मुंबईच्या सहा जागा आणि पुण्याच्या चार जागा निवडून येतील. संविधान धोक्यात नाही. तसेच जागा मिळाली नाही तरी देखील मी महायुतीसोबत असेल. आम्ही मुस्लिम वर्गासोबत आहोत. विधानसभेच्या जागा, मंत्रिपद, महामंडळ देण्याचे मान्य केले गेले आहे. आम्हा लाप्रकाश आंबेडकर यांच्यामुळे कहाणी देखील फरक पडणार नसून, महाविकास आघाडीला फरक पडणार आहे. तसेच महायुतीकडून जागा मिळाली कारण शरद पवार यांना महादेव जानकर जाऊन भेटले. तसेच शरद पवार साहेबांचे आणि माझे चांगले संबंध आहे आणि आम्ही संबंध वाढविण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच रामदास आठवले यांनी यावेळी सल्ला देखील दिला की, शरद पवार यांना मोदी भटकते आत्मा असे उद्देशाने बोलले नसावे, पवार विरुद्ध पवार असा सामना बारामतीमध्ये व्हायला नको होता. तसेच वेगळा विचार सुप्रिया सुळेंनी करायला करायला पाहिजे होता. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती