पीएम मोदींचा वखवखलेला आत्मा महाराष्ट्रात फिरत आहे, उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

बुधवार, 1 मे 2024 (09:26 IST)
महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे, पुणे लोकसभा उमेदवार रवींद्र धंगेकर, शिरूर लोकसभा उमेदवार अमोल कोल्हे आणि मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संजोग वाघोरे यांच्या प्रचारासाठी वारजेत आयोजित सभेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर घणाघात टीका केली. ते म्हणाले, ज्या प्रकारे भटकता आत्मा असतो त्याच प्रमाणे वखवखलेला आत्मा देखील असतो जो सध्या महाराष्ट्रभर फिरत आहे. शरद पवार यांनी देखील मोदी हे पदाची प्रतिष्ठा घालवत असल्याची टीका केली. 

वारजेतील सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळा साहेब थोरात, विठ्ठल मणियार, अनिल देशमुख, सचिन अहिर, जगन्नाथ शेवाळे, कुमार गोसावी, चंद्रकांत मोकाटे, मदन बाफना, आदी उपस्थित होते. 
सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या महाराष्ट्रासाठी अनेकांनी स्वतःच्या प्राणांचा बलिदान देऊन अनेकांनी हौतात्म्य पत्करले, अशा महाराष्ट्राला लुटण्याचं काम भाजप करत आहे. महाराष्ट्राची अस्मिता आज पायदळी तुडवली जात आहे. भाजपला ज्या शिवसेने ने वेळोवेळी मदत केली त्या शिवसेनेला आज ते संपवायला निघाले. भ्रष्टाचार कोणी केला आणि क्लीन चिट कोणाला मिळाली हे आज जनता सर्व जाणते. आम्ही सोबत असताना मोदी कधीही महाराष्ट्रात आले नाही मात्र आज त्यांना जिल्ह्याजिल्ह्यात फिरावं लागत आहे. एक अकेला सबसे भारी, सोबत सारे भ्रष्टाचारी यंदा 400 पार नव्हे तर तडीपार होणारअसं म्हणत ठाकरे यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.     
 
Edited By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती