सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा प्रसार आणि प्रचार जोरात सुरु आहे. राज्यात तापमानात वाढ झालेली असून सध्या उकाडा वाढत आहे. उन्हात देखील राजकीय मंडळी खेड्यात जाऊन लोकांना भेटत आहे. यंदा बारामती लोकसभा मतदार संघ हे अजित पवार यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आणि प्रातिष्ठेचं आहे. त्यामुळे त्यांचं कुटुंब प्रचारासाठी मैदानात उतरले आहे.
बारामती मतदार संघात पवार कुटुंबातील सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात लढत होणार आहे. पार्थ आपल्या आईच्या सुनेत्रा पवारांसाठी प्रचार करत आहे. पार्थ बारामती लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ता आणि नागरिकांशी संवाद साधत आहे. त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली असून यावरून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.