आतंकवादींची वकिली करणाऱ्यांना राममंदिर चुकीचेच वाटेल, सीएम योगींची सपा वर टीका

शुक्रवार, 10 मे 2024 (13:53 IST)
गोरखपूर येथील जनसभेमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सपा आणि काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. सपा नेता रामगोपाल यादव यांचे नाव न घेता योगी म्हणाले, सपाच्या लोकांना राममंदिर चुकीचे वाटते आहे.   
 
गोरखपूर मधून भाजप प्रत्याशी किशन शुक्ला यांच्या नामांकन नंतर शुक्रवारी दिग्विजयपार्क मध्ये आयोजित जनसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सपा आणि काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. आतंकवादीची वकिली करणाऱ्यांना राममंदिर चुकीचेच वाटेल. ह्याच सपा आणि काँग्रेसच्या काळात संकटमोचन मंदिरापासून देशातील अनेक प्रमुख धार्मिक स्थळांवर आतंकवादीने हल्ले केलेत. ज्यामध्ये हजारो लोकांनी जीव गमावला.  
 
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, तीन टप्प्यात 285 लोकसभा सिटांसाठी निवडणूक संपन्न झाली आहे.10 राज्य मी फिरून आलो. पूर्ण देशात परत एकदा मोदी सरकारची गुंज आहे ज्यांनी रामाला आणले तेच रामराज्य आणतील. सर्व समस्यांचे समाधान रामराज्य आहे. तसेच योगी म्हणाले की, तुमच्या मतामुळे मोदींनी देशामध्ये विकास केला. ही निवडणूक सत्ता मिळवण्यासाठी नाही तर विकसित आणि आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी आहे.  

Edited By- Dhanashri Naik   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती