तामिळनाडूच्या दक्षिण वीरूधून नगर जिल्ह्यात शिवकाशीच्या सेंगामालपट्टी गावात फटाक्याच्या कंपनीमध्ये स्फोट झाल्याने 10 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मृतांमध्ये सहा महिला असून 4 पुरुष आहे. पोलिसांनी सांगितले की, यामध्ये 13 लोक गंभीररीत्या भाजले आहेत. व त्यांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, तमिलनाडुचे राज्यपाल आर.एन.रवि, मुख्यमंत्री एम.के.स्टालिन आणि भाजपा प्रदेश अध्यक्ष के.अन्नामलाई, टीएनसीसी प्रमुख के.सेल्वापेरुन्थागई, टीएमसी नेता जी.के.वासन, पीएमके नेत्यांसहित वेगवेगळ्या राजनीतिक दलाच्या नेत्यांनी फटाके विस्फोट मध्ये झालेल्या मृत व्यक्तींकरिता दुःख व्यक्त केले आहे.