महिला PSI ने केस बंद करण्यासाठी लाच मध्ये मागितला मोबाईल, नकली फोन घेऊन पोहचले ACB ऑफिसर

शुक्रवार, 10 मे 2024 (11:41 IST)
महाराष्ट्र भ्रष्टाचार निरोधक ब्युरो(ACB) ने एक महिला पोलिस सब इंस्पेक्टरला अटक केली आहे. जिने एक प्रकरणात आरोपीला केस बंद करण्यासाठी लाच मध्ये मोबाईल फोन मागितला. ACB ने पीडितेला एक नकली फोन दिला व त्या फोनला महिला पोलीस घेताना तिला ताब्यात घेतले.   
 
महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये लाचखोरीचा एक आश्चर्यचकित करणारे प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये एक महिला पोलीस सब इन्स्पेक्टर(PSI) ने लाच मध्ये मोबाईल फोनची मागणी केली होती. वेळेवर तक्रार मिळाल्याने अँटी करप्शन ब्युरो ने महिला पोलिसला अटक केली आहे. 
 
महाराष्ट्र भ्रष्टाचार निरोधक ब्युरोच्या मते, महिला पोलीस सब इंस्पेक्टरने एका प्रकरणात आरोपीची मदत करण्यासाठी लाच मध्ये फोन मागितला. ही पोलीस महिला PSI पश्चिम मुंबई आंबोली पोलीस स्टेशनमध्ये PSI आहे. या PSI पोलीस महिलाने जोगेश्वरीमध्ये नोंदवलेल्या एका प्रकरणात मदत करण्यासाठी त्या बदल्यात सॅमसंग(A_55) मोबाईवळ फोनची मागणी केली होती. या फोनची किंमत 45 हजार एवढी आहे. ACB अधिकारींनी सांगितले की, त्यांच्याजवळ तक्रार आली असता त्यांनी एक प्लॅन बनवला आणि महिला पोलीस कर्मचारीला लाच रूपात फोन स्वीकारतांना पकडले. व तिला अटक करण्यात आली.   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती