बिहारमध्ये भयंकर कार अपघातात 3 तरुणांचा मृत्यू

शुक्रवार, 10 मे 2024 (12:46 IST)
बिहार मधील भागलपूर येथे रंगरा ठाणे परिसरातात भावानीपूर गावाचा जवळ राष्ट्रीय राजमार्ग-31 वर आज सकाळी कार अपघातात तीन तरुणांनाच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीररीत्या जखमी झाले आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार पूर्णिया कडून येणारी कार भवानीपूर गावाच्या उलट दिशेने येत होती. व समोरून जलद गतीने एक हाईवा समोर आल्याने दोघांची समोरासमोर टक्कर झाली ही टक्कर एवढी भीषण होती की, या मध्ये 3 तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला. 
 
सूचना मिळ्ताच वेळेवर पोहचलेल्या पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. व मृतांना कराच्या बाहेर काढले. व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. वेळेचा फायदा घेऊन हाईवा चालक फरार झाला असून त्याचा शोध सुरु आहे. 

Edited By- Dhanashri Naik   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती