सातारा येथील जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 2013 मध्ये भाजपने मला पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केल्यानंतर मी रायगड किल्ल्यावर गेलो होतो आणि कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर बसून ध्यान केले होते . त्यावेळेस मिळालेली प्रेरणा, ऊर्जा आणि आशीर्वाद यामुळेच मी गेली 10 वर्षे तेच आदर्श विचार जगण्याचा प्रयत्न केला आहे. 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला, काँग्रेसने गुलामगिरीची मानसिकता वाढू दिली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आजही जगात जेव्हा जेव्हा नौदलाची चर्चा होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले जाते, मात्र इतकी वर्षे स्वतंत्र भारताच्या नौदलावर ब्रिटिशांचे प्रतीक होते. मोदींच्या एनडीए सरकारने ते चिन्ह काढून त्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचे चिन्ह लावले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलावर साऱ्या जगाचा विश्वास होता, पण इतकी वर्षे स्वतंत्र भारताच्या नौदलाच्या ध्वजावर ब्रिटिशांचे चिन्ह होते. मोदींनी येऊन इंग्रजांच्या खुणा काढल्या. आपल्या नौदलाच्या ध्वजात छत्रपती शिवरायांच्या चिन्हाला स्थान दिल्यावर या ध्वजाची ताकद वाढेल, असा निर्धार मोदींनी केला.