एकीकडे देशात 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज 13 राज्यांतील 88 लोकसभा जागांवर मतदान होत आहे. तर निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ज्येष्ठे नेते प्रचार करत आहे. आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकातील विजापूर येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी आणि भाजपला टोला लगावला. ते म्हणाले,'आजकाल नरेंद्र मोदी भाषण करताना खूप घाबरलेले दिसत आहेत,
मला वाटते की काही दिवसात त्यांना स्टेजवर अश्रू अनावर होतील, गेल्या दहा वर्षांत त्यांनी त्यांच्या आवडत्या लोकांना कोट्यधीश बनवले आहे, त्यांनी विमानतळ-बंदरे बनवली आहेत. , वीज, खाणी, सौर-पवन ऊर्जा, संरक्षण क्षेत्र... सर्व काही अदानी आणि त्यांच्या अब्जाधीशांच्या हाती दिले आहे. ते बोलतात एक आणि करतात दुसरे. पंतप्रधानांनी गरिबांसाठी काहीच केले नाही. आणि भविष्यात देखील ते काहीच करणार नाही. आम्ही जनतेला वचन देतो की मोदींनी ज्या अब्जाधिशांना जेवढे पैसे दिले आहे. तेवढे पैसे आम्ही भारतातील गरिबांना देऊ