रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

मंगळवार, 7 मे 2024 (20:46 IST)
आज महाराष्ट्र 11 लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. मतदारांनी मोठ्या उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावला. आज या प्रक्रियेत बारामती मतदार संघावर मतदान  झाले. 
 
राज्य महिला आयोगांच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या वादात अडकल्या असून त्यांच्यावर ईव्हीएमची पूजा केल्या प्रकरणी पुण्यात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली चाकणकर या ताट आणि दिवा घेऊन मतदान केंद्रावर आल्या आणि मतदानापूर्वी त्यांनी ईव्हीएम मशीनची पूजा केली. 

हा प्रकार मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्याच्या लक्षात आल्यावर त्याने त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडणूक लढवत असून त्यांच्या प्रचारात रुपाली चाकणकर सक्रिय आहे. त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत होत्या. आता त्यांच्यावर ईव्हीएम ची पूजा केल्याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Edited By- Priya Dixit   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती