केसांमध्ये गुंडाळला साप VIDEO बघून हैराण व्हाल

Webdunia
बुधवार, 22 डिसेंबर 2021 (17:59 IST)
Viral Video साप हे नाव ऐकूनच अनेक लोकांचा जीव सुकतो. हा अतिशय प्राणघातक प्राणी असला तरी असे काही लोक आहेत जे या विषारी सापांना अजिबात घाबरत नाहीत. तो त्यांना पाळीव प्राण्याप्रमाणे सोबत ठेवतात आणि मजेत फिरतात. या प्रकाराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे बघून आपणही हैराण व्हाल. कारण अशा प्रकारची आम्ही स्वप्नातही कल्पना करु शकत नाही, असे युजर्सचे म्हणणे आहे. चला जाणून घेऊया व्हिडिओमध्ये काय खास आहे.
 
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक महिला खरेदी करताना दिसत आहे. तिने केसांभोवती साप गुंडाळला आहे. पहिल्या दृष्टीक्षेपात हेअर बँड लावल्यासारखे दिसेल. मात्र कॅमेरा झूम केला असता तो बँड नसून विषारी साप असल्याचे समजते. ही महिला सापाला घेऊन खरेदीसाठी आली आहे यावर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनाही विश्वास बसत नाही.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Snakes Mania (@snakes.mania)

हा व्हिडिओ snakesmania ने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ हजारो वेळा पाहिला गेला आहे. त्याच वेळी यूझर्स यावर अनेक प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. 
 
इतर लोक तिच्या डोक्यातील साप बघून घाबरत असले तरी तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत नसून ती बिनधास्तपणे शॉपिंग करताना दिसत आहे. 

संबंधित माहिती

पुढील लेख