गुजरात बोर्डाचा अजब शोध, रामाने सीतेचे अपहरण केले

गुजरात बोर्डाच्या १२ वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकात सीतेचं अपहरण रामाने केल्याचा उल्लेख आहे. संस्कृत साहित्याचा परिचय करून देणाऱ्या या पुस्तकाच्या १०६ क्रमांकाच्या पानावर एक परिच्छेद आहे. यात असं लिहिलं आहे की, ”इथे कवीने त्यांच्या अमूल्य विचारांच्या आधारावर रामाच्या चरित्राचे एक सुंदर चित्र सादर केलं आहे. जेव्हा राम सीतेचं अपहरण करतात, तेव्हा लक्ष्मण हा संदेश प्रभू रामचंद्रांना देतात, याचं अतिशय मार्मिक वर्णन केलं आहे.” असं या परिच्छेदात नमूद करण्यात आलं आहे.
 
हे पुस्तक इंग्रजी माध्यमासाठी लिहिण्यात आलं असून हा परिच्छेद कवी कालिदास यांच्या ‘रघुवंश’ या महाकाव्याबद्दल आहे. सुदैवाने ही गडबड फक्त इंग्रजी पुस्तकात झाली असून गुजराती पाठ्यपुस्तकात अशी कोणतीही चूक झालेली नाही. गुजरात बोर्डाच्या पाठ्यपुस्तक विभागाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. नितीन पेठानी यांनी ही चूक झाल्याचं कबूल केलं असून ही अनुवादकाची चूक असल्याचं म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती