पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधी काय धक्का देतील सांगत येत नाही. मात्र असाच प्रयोग त्यांच्यावर उलटला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी यांच्या सोबत चर्चा करत असतांना मोदी यांनी मराठीत संवाद सुरु केला. मात्र झाले उलटेच हा मराठी नसून भैया निघाला , मग काय हिंदीत झाला संवाद.
मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉलिंगद्वारे थेट संवाद साधताना महाराष्ट्रातील नाशिकच्या लाभार्थ्याशी मोदींनी मराठीतून संवाद साधण्यास सुरुवात केली. पण इथेच ते फसले. कारण नाशिकचा हा लाभार्थी मूळचा बिहारी निघाला, जो ३० वर्ष नाशिकच्या देवळाली भागात राहून देखील त्याला मराठी येत नाही. आपली फजिती झाल्याचं लक्षात येताच मोदींचा चेहरा पडला आणि पुढील सगळा संवाद हिंदीतूनच झाला.
एक लाभार्थी होते हरि ठाकूर. मोदींनी त्यांचे नाव घेतले आणि नाशिकचा म्हणजे त्याला मराठी येणारच असं गृहित धरून त्यांनी थेट मराठीतून हरि ठाकूर यांचं ‘हरिभाऊ’ करत बोलण्यास सुरुवात केली. मोदींच्या मराठी प्रश्नांमुळे हरि ठाकूर पुरते गोंधळले. त्यांना काय उत्तर द्यावे ते कळत नव्हते. इतकेच काय तर मोदींनी ‘बसा… बसा…’ असं म्हटल्यावर त्यांना ते ही कळलं नाही. मग बाजूला बसलेल्या अन्य लाभार्थ्यांनी त्यांना खाली बसवलं. ‘मराठी येतं की नाही?’ असं विचारल्यावर त्यांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं आणि मोदींची फजिती झाली. मग मोदींनी हिंदीतून संवाद साधला आणि हरिभाऊंना थोडा दिलासा मिळाला.
पंतप्रधान मोदी आणि हरि ठाकूर यांच्यात झालेल्या संवादाची सुरुवात पुढील प्रमाणे होती:
पंतप्रधान मोदी: हरिभाऊss…हरिभाऊ बोला काय म्हणताय??
हरि ठाकूर: नमस्ते सर
पंतप्रधान मोदी: नमस्ते… काय म्हणताय…
हरि ठाकूर: ठीके सर.
पंतप्रधान मोदी: बसा… बसा… बसा… (हरि ठाकूर यांना कळालंच नाही, अखेर अन्य लाभार्थ्यांनी त्यांना खाली बसवलं) हा बोला..
हरि ठाकूर: जी मुजफ्फरपूर रहनेवाला हूँ.. हरि ठाकूर… नासिक में ३० साल से रहतां हूँ सर…
पंतप्रधान मोदी: तुला मराठी येतायत की नाई???
हरि ठाकूर: नाई सर…
पंतप्रधान मोदी: वाह… एकदम (या पुढे मोदी नक्की काय शब्द बोलले ते कळतच नाही)
या नंतर पुढील सर्व संवाद हा हिंदीतूनच झाला.