युती तुटण्याच्या मार्गावर, उध्वव ठाकरे घेणार मोठा निर्णय

गुरूवार, 31 मे 2018 (17:24 IST)
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या खडाजंगीमुळे भाजपा आणि शिवसेनेतील वाढलेला तणाव वाढला आहे. आता युती तुटणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार असून त्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागल आहे. दुपारपासून 'मातोश्री'वर शिवसेना नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू असल्याचं समजतं. त्यात ते काय निर्णय घेणार, याबद्दलची उत्सुकता ताणली गेली आहे. तर शिवसेनेची पालघर मध्ये जरी पराभव झाला असला तरीही कामगिरी उत्तम झाली आहे. त्यांना हवे असलेले मतदान पक्षाला झाले आहे. त्यामुळे आता येत्या निवडणुकी आगोदर उद्धव ठाकरे युती तोडणार अशी शंका निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात 2014 मध्ये 288 जागांसाठी विधानसभा निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी: 122 जागा, शिवसेना: 63 जागा, काँग्रेस: 42 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस : 41 जागा मिळाल्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती