“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर हात उगारू नका पण कोणी जर अंगावर हात उगारला तर तो जागेवर ठेवू नका. या शिकवणीच्या अंमलबजावणीची सुरूवात जर आम्ही केली तर मग हे जे कोणी नामर्द हल्लेखोर आहेत ज्यांनी एकट्या दुकट्याला गाठून गोळ्या घालून , गळा चिरून हत्या केली आहे या नामर्दांच्या अवलादीला महाराष्ट्रामध्ये ठेचून टाकू.”असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केडगांव येथे दुहेरी हत्याकांडात मारले गेलेले संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी या कुटुंबांना वाऱ्यावर सोडणार नाही. या कुटुंबाची जबाबदारी शिवसेनेने घेतली आहे. त्यांना संपूर्ण ताकद आणि आधार शिवसेना देईल असे स्पष्ट शब्दात सांगितले. यावेळी त्यांनी नगरमधील गुंडगिरी त्यांना असलेला राजकीय वरदहस्त याच्यावर सडकून टीका केली. मंत्र्यांनी अधिकार दाखवला तर सहकारी मंत्र्यांच्या अधिकाराबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे मुख्यमंत्री असतील तर मला वाटतं की हे सरकार ‘निकम्मं’ आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली.