2006 मध्ये बाललैंगिक अत्याचाराची संख्या 18 हजार 967 होती. 2016 मध्ये ती 1,06,958 पर्यंत झाली आहे. या दहा वर्षांच्या कालावधीतील शेवटच्या चार वर्षांत जास्त वाढ झाली आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एनसीआरबी) माहितीनुसार भारतातील लहान मुलांवर होणार्या अत्याचारात 2005 ते 2016 दरम्यान 14 टक्के वाढ झाल्याचे चाइल्ड राइट्स अँड यूच्या (क्राय) संस्थेने अहवालात नमूद केले आहे.