‘एमपीएससी’चा निकाल जाहीर होण्यापूर्वीच सोशल मीडियावर ?

शुक्रवार, 1 जून 2018 (09:10 IST)
राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल बुधवारी रात्री उशिरा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संकेतस्थळावरून जाहीर झाला. मात्र, त्यापूर्वीच दोन दिवस हा निकाल सोशल मिडीयावर फिरत होता अशी चर्चा आहे.
 
सोशल मिडीयावर फिरलेल्या निकालातील काही नावे आणि अंतिम निकालातील काही नावे सारखीच असल्याचे सांगितले जात आहे. समांतर आरक्षणाच्या मुद्दय़ावरून राज्यसेवा परीक्षेबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात हा अंतिम निकाल अडकला होता. यंदा राज्यसेवा परीक्षेची पूर्व परीक्षाच एप्रिलमध्ये झाली. त्यानंतर मुख्य परीक्षेच्या मुलाखती झाल्या. गेला महिनाभर हा निकाल तयार होता. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेमुळे तो जाहीर केला जात नव्हता. त्यानंतर हा निकाल ‘लीक’झाल्याची चर्चा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती