कोणत्याही खात्यात दुसरा कोणताही व्यक्ती पैसे जमा करू शकणार नाही

सोमवार, 10 सप्टेंबर 2018 (15:07 IST)
ग्राहकांची बँक खाती सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय स्टेट बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणत्याही खात्यात दुसरा कोणताही व्यक्ती पैसे नाही जमा करु शकणार. म्हणजेच आता फक्त तुम्हीच तुमच्या एसबीआय खात्यात कॅश काऊंटरवर जाऊन पैसे जमा करु शकता. वडील देखील आपल्या मुलाच्या खात्य़ात पैसे नाही जमा करु शकणार.
 
आयकर विभागाने सरकारी बँकांना सूचना दिल्यानंतर हा नियम बनवण्यात आला आहे. त्यामुळे आता दुसरा कोणताही व्यक्ती तुमच्या खात्यात पैसे नाही जमा करु शकणार. बँकेने हा नवा नियम आणल्यानंतर त्याला पर्याय देखील आणला आहे. एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा करायचे असतील तर त्याला खातेधारकाचे अनुमती पत्र आणावं लागेल. बँकेच्या काउंटरवर पैसे जमा करताना दिल्या जाणाऱ्या स्लीपवर ज्याचे खाते आहे त्याची सही असणं आवश्यक आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती