रोज २०० रु गुंतवा आणि मिळावा व्याजासह ३४ लाख रुपये

गुरूवार, 6 सप्टेंबर 2018 (17:22 IST)
हे कोणतेही आमिष नाही. कोणतीही स्कीम नाही किंवा कोणताही फसवणुकीचा प्रकार नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंत होवून ही बातमी वाचू शकता. तुमच्या मित्राना सागू शकता. तर महिन्याच्या पगारात सर्व घर खर्च भागवावा लागतो. मात्र हवी तशी बचत होत नाही त्यामुळे मनाला रुख रुख राहते. परंतु तुम्हाला एक महत्वाची गोष्ट माहिती आहे का, अशा काहीही छोट्या छोट्या योजना आहेत. ज्यात तुम्ही थोठी थोडी गुंतवणूक करू शकता. त्यासाठी तुम्हाला सरकारी पब्लिक प्रॉव्हिडंट फंडचं खातं उघडावं लागणार असून, त्यात पैसे टाकावे लागणार आहेत. यामध्ये विशेष म्हणजे ज्या लोकांना महिन्याच्या बजेटमधून पैशांची बचत करणं अवघड जातं, त्यांच्यासाठी पीपीएफ हा चांगला पर्याय आहे.
 
तुम्हाला काय करावे लागेल :
पीपीएफसाठी तुम्ही दररोज 50 आणि 100 रुपये वाचवून मोठी रक्कम जमा करता येणार आहे.  अगदी रोजची थोडी गुंतवणूक सुद्धा जास्त फायदा देण्यासाठी पीपीएफ हा उत्तम पर्याय आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडा(पीपीएफ)च्या खात्यात दररोज तुम्हाला 200 रुपये वाचवून या योजनेत पैसे गुंतवावे लागतील. 20 वर्षांनंतर गुंतवलेल्या 200 रुपयांचे कधी 34 लाख रुपये होतील हे समजणार नाही. तुम्हाला दररोज 200 रुपये गुंतवल्यानंतर 20 वर्षांनी व्याजासह 34 लाख रुपये मिळतील. कसे तयार होतात 34 लाख- तुम्ही दररोज या योजनेत 200 रुपये गुंतवल्यानंतर महिन्याभरात 6000 रुपये गुंतवणूक होते. अशा प्रकारे तुमचे वर्षाला 72000 रुपये बचत होतात.
 
तुम्ही असे 15 वर्षं पैसे गुंतवल्यास तुमच्या खात्यात 10,80,000 रुपये जमा होतील. तसेच या योजनेत 5 वर्षांची वाढ करण्याची सुविधा आहे. असं केल्यास 20 वर्षांत तुमच्या खात्यात जवळपास 14,40,000 रुपये जमा होणार आहेत. पीपीएफमध्ये तुम्हाला 7.6 टक्के व्याज मिळतं. 20 वर्षांपर्यंत व्याजाचा दर कायम राहिल्यास तुम्हाला 33.92 लाख रुपयांचा परतावा मिळतो. तुम्हाला तुमच्या पैशावर जवळपास 19.52 लाख रुपयांचं निव्वळ व्याज मिळते. त्यामुळे आता वात कसली पाहत आहात लवकर गुंतवणूक करा. तुम्ही ही गुंतवणूक पोस्ट बँक, सरकारी बँक अथवा मान्यताप्राप्त कोणत्याही बँकेत हे खाते उघडू शकता. सोबतच त्याला वारस देवू शकणार असून सरकारचे १०० टक्के नियंत्रन आहे त्यामुळे नो टेन्शन!

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती