कोरोनाव्हायरस शरीरातून कायमचा जाण्यासाठी लागतो इतका कालावधी

बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (11:58 IST)
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातला असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याची लागण झालेले रुग्ण बरे होण्याची दर वाढत असली तरी काही देशांमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला पुन्हा कोरोना संसर्ग होत असल्याचे धक्कादायक प्रकरणं देखील समोर येत आहे. अशात प्रश्न पडतो की कोरोना व्हायरस शरीरातून कायम जाण्यासाठी किती कालावधी लागतो?
 
यातच आता इटलीमधील शास्त्रज्ञांनी याबाबत माहिती देत सांगितले की कोरोना संक्रमित रुग्णाच्या शरीरातून व्हायरस जाण्यासाठी किमान एका महिन्याचा कालावधी लागतो. अशात रुग्णांनी रिर्पोट पॉझिटिव्ह आल्यानंतर एका महिन्यांनी त्यांची दुसरी चाचणी केली पाहिजे.
 
सध्या जगात एकूण 2 कोटी 58 लाख 89 हजार 824 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील 1 कोटी 81 लाख 72 हजार 671 रुग्ण निरोगी झाले आहेत. तर, 8 लाख 60 हजार 270 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, जगभरात तब्बल 68 लाख 56 हजार 883 अॅक्टिव्ह रुगण आहेत. 
 
एवढेच नाही तर पाच निगेटिव्ह चाचणींपैकी एकाचा निकाल चुकीचा असू शकतो, असेही त्यांनी म्हटले.
 
Modena and Reggio Emilia युनिव्हर्सिटीचे डॉ. फ्रान्सिस्को व्हेंतुरेली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1162 रुग्णांचा अभ्यास केला. यात कोरोना रूग्णांची दुसरी चाचणी 15 दिवसांनी, तिसरी 14 दिवसांनी आणि चौथ्यांदा 9 दिवसांनी करण्यात आली. यात आढळून आले की पाच निगेटिव्ह चाचणींपैकी एकाचा निकाल चुकीचा असतो. या ‍रिर्पोटप्रमाणे 50 वर्षापर्यंतच्या वयोगटातील लोकांना 35 दिवस आणि 80 वर्षांपेक्षा अधिक वय असणार्‍या रुग्णांना पूर्ण पणे बरे होण्यासाठी 38 दिवस लागतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती