घाईघाईत लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय ठरु शकतो घातक: WHO

शनिवार, 11 एप्रिल 2020 (13:33 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जाहीर केलेला 21 दिवसांचा लॉकडाउन 14 एप्रिलला संपत आहे. मात्र अजूनही परिस्थिीत खूप सुधार आला नसल्याने लॉकडाउन वाढवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत.
 
दरम्यान लॉकडाउनचे निर्बंध उठवण्यास घाई केली तर त्याचे घातक परिणाम होतील असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम यांनी देशाच्या प्रमुखांना लॉकडाउन सुरु ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
 
त्यांचे म्हणणे आहे की लॉकडाउनचे निर्बंध हटवण्यात घाई केली तर त्याचे घातक परिणाम भोगावे लागती. त्यांनी म्हटले की योग्य काळजी घेतली गेली नाही तर खूप मोठ्या धोक्याला सामोरा जावं लागेल. 
 
त्यांनी स्पेन आणि इटली लॉकडाउनचे निर्बंध शिथील करत असून लोकांना कामावर जाण्याची परवानगी देत असल्याच्ये परिणाम पाहत उदाहरण दिलं आहे. त्यांच्याप्रमाणे घाईघाईत लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतला तर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती