इटलीकडून कोरोना व्हायरसवरील लस तयार करण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. इटली सरकारने, कोरोनावरील अँटीबॉडीज शोधले असल्याचा दावा केला आहे. इटलीतील न्यूज एजेन्सी एएनएसएनुसार, रोममधील स्पालनजानी रुग्णालयात लसीवर परिक्षण करण्यात आलं आणि उंदरावर अँटीबॉडीज तयार करण्यात आल्या असून याचा परिणाम दिसला असल्याचं सांगण्यात आलं आहे.
स्पालनजानी रुग्णालयात चाचणी करण्यात आली असून उंदरांवर अँटीबॉडीज तयार करण्यात आल्या आहेत. लसीची तपासणी करण्यासाठी वैज्ञानिकांनी उंदीरांचा वापर केला. संशोधकांनी उंदरावर लसीचं परिक्षण केलं. आणि एकाच लसीकरणानंतर उंदरांनी अँटीबॉडी विकसित केल्या. याचा प्रयोग मानवी पेशींवरही करण्यात आला आणि त्याचा परिणामही दिसला असल्याचा दावा करण्यात आला आहे.