ऑनलाईन खरेदीत फसवणूक,लोकांना प्रॉडक्ट ऐवजी साबण, बटाटे मिळाले

बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (12:04 IST)
सध्या ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ प्रचंड वाढत आहे, त्याचप्रमाणे फसवणुकचा प्रकार  देखील  वेगाने वाढत आहे. सध्या सणांनिमित्त ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर मोठी विक्री सुरू आहे. या विक्रीदरम्यान ऑनलाइन शॉपिंग फसवणुकीची अशी दोन प्रकरणे अलीकडेच,समोर आली आहेत, लोकांना पार्सल उघडल्यावर मोठा धक्काच बसला आहे. महागड्या आयफोनच्या जागी 5 रुपयांचा विम बार आल्याच्या बातमीने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला होता, मात्र त्यानंतर ड्रोन कॅमेऱ्यांऐवजी बटाटे आणि लॅपटॉपच्या जागी साबण आल्याचे वृत्त मिळत आहे. 
 
नालंदामध्ये एका तरुणाने एका ऑनलाइन शॉपिंग साइटवरून 85,000 रुपयांचा ड्रोन कॅमेरा मागवला होता. हा कॅमेरा त्या शॉपिंग साईटवर फक्त 10000 रुपयांना उपलब्ध होता. यामुळे तरुणाने ऑनलाइन पेमेंट करून त्वरीत ऑर्डर दिली. मात्र कॅमेऱ्याच्या डिलिव्हरीवर जेव्हा पार्सल उघडले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या पार्सलमध्ये ड्रोन कॅमेऱ्याऐवजी बटाटे बाहेर आले. मात्र, तरुणाच्या समजुतीमुळे  फसवणूक होण्यापूर्वीच पकडली गेली. 
 
एका ऑनलाईन शॉपिंग साईटच्या  वतीने 10000 मध्ये 85000 चा कॅमेरा देण्याच्या प्रकरणावर तरुणाने मीडियाला सांगितले की, सध्या सणासुदीच्या ऑफरमुळे तो स्वस्त दिला जात आहे. अशा स्थितीत तरुणाला आधीच संशय आला. यामुळेच डिलिव्हरी बॉय ऑर्डर देण्यासाठी आला तेव्हा तरुणाने पार्सल उघडताना व्हिडिओ बनवला.
 
हा कॅमेरा ऑर्डर करणारे ज्वेलर्स चैतन्य कुमार यांनी मीडियाला सांगितले की, त्यांनी एका ऑनलाईन शॉपिंग  कंपनीकडून डीजेआय ड्रोन कॅमेरा ऑनलाइन बुक करून त्याचे पूर्ण पैसे देखील भरले. रविवारी सॅडो फॅक्स ऑफिसमधून डिलिव्हरी पार्सल आल्यावर चैतन्यला संशय आला. यानंतर त्याने पार्सल देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी मॅनला पार्सल उघडण्यास सांगितले आणि त्याचा व्हिडिओ बनवला. डिलिव्हरी बॉयने पार्सल उघडताच त्यात एक किलो बटाटे बाहेर आले.
 
डिलिव्हरी बॉयने कॅमेऱ्यासमोर कबूल केले की, त्याने  ऑफिसमधून पार्सल आणला होता. ज्यामध्ये ड्रोन कॅमेऱ्याऐवजी बटाटा बाहेर आला. हे प्रकरण आता पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप अर्ज आलेला नाही. अर्ज मिळाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ड्रोन कॅमेऱ्यांऐवजी बटाटे मिळण्याच्या संदर्भात या तरुणाने व्हिडिओसोबत कंपनीशी बोलणे सुरु केले असता कंपनीने तरुणाला पैसे देण्यास होकार दिला असून  तरुणाने पैसे घेण्यास नकार दिला. त्याला पासने नाही तर प्रॉडक्ट पाहिजे.  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती