गळ्यात साप घालून साधू इंस्टाग्राम रील बनवत असताना सापाने चावा घेतला आणि

रविवार, 25 सप्टेंबर 2022 (17:04 IST)
उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातून 25 सप्टेंबर रोजी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे राहणारा एक साधू गळ्यात काळा विषारी साप गुंडाळून इन्स्टाग्रामच्या रील निर्मात्यांसाठी पोज देत होता. यादरम्यान सापाने त्याला चावा घेतला, त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथून डॉक्टरांनी त्याला लखनौच्या रुग्णालयात रेफर केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.बजरंगी साधू असे मयत साधूबाबाचे नाव असून तो काकोरी लखनौच्या औरस भागातील बनिया खेराचा रहिवासी होता.
 
वृत्तानुसार, परिसरात पंक्चर दुरुस्तीचे दुकान चालवणाऱ्या सुभेदाराच्या दुकानात एक विषारी काळा साप आढळून आला. सुभेदाराने काठीने सापाला मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तेथे पोहोचलेल्या बजरंगीने सुभेदाराला सापाला मारण्यास नकार दिला. त्यानंतर बजरंगीने सापाला पकडून पेटीत ठेवले आणि दुकानाबाहेर आणले.
 
रील बनवण्याची इच्छा असलेल्या काही उत्सुक प्रेक्षकांनी विचारल्यानंतर बजरंगीने डब्यातून सापाला बाहेर काढले आणि त्याच्या गळ्यात गुंडाळले आणि त्याच्यासाठी पोझ देऊ लागला. साधू कधी सापाला गळ्यात गुंडाळायचा तर कधी खांद्यावर आणायचा, या दरम्यान साप त्याला चावला. त्याला तातडीनं रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती