बिनधास्त काव्या’ चा सर्व बनाव झाला उघड

सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (14:59 IST)
‘बिनधास्त काव्या’ ही अल्पवयीन युवती याच महिन्यात १० सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेपासून बेपत्ता झाली होती. रागाच्या भरात निघून गेलेल्या काव्याला रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) मदतीने काही तासांत शोधण्यात शहर पोलिसांना यश आले. खुशीनगर एक्स्प्रेसमधून तिला ताब्यात घेत मध्य प्रदेशातील इटारसी रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले. त्यानंतर तिला औरंगाबाद शहरात आणले. मात्र, आता या घटनेबाबत वेगळीच माहिती समोर आली असून काव्याने ठरवूनच हे कृत्य केल्याचं उघडकीस आलं आहे.
 
१६ वर्षांची बिनधास्त काव्या प्रसिद्ध युथट्युबर आहे. आईवडील अभ्यासावरून रागावल्याने शुक्रवारी दुपारपासून काव्या घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती घरी परतली नाही. तिचा मोबाईल देखील घरीच होता. यासंबंधी छावणी पोलिसांत मिसिंगची तक्रार आई वडिलांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता सरांनी माहिती घेऊन तात्काळ भोपाळ पोलिसांशी संपर्क साधला. अखेर काही तासांत तिला शोधण्यात यश आले. इटारसी रेल्वे स्टेशनवर काव्या आढळून आली होती. मात्र, आता या मिसींग प्रकरणात काहीही तथ्य नसून हे काव्या आणि तिच्या कुटुंबीयांनी केलेला बनाव असल्याचे खालच्या पातळीवर जाऊन दर्जाहीन प्रसिद्धीसाठी हे कृत्य केलं गेलं असल्याची माहिती बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा अ‌ॅड. आशा शेरखाने-कटके यांनी दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती