मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या सतत वाढत आहे आणि त्यासोबतच कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनाही चिंताजनक पातळीवर पोहोचल्या आहेत. या गंभीर समस्येला तोंड देण्यासाठी आणि रेबीजसारख्या जीवघेण्या आजाराला आळा घालण्यासाठी, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक मोठे पाऊल उचलले आहे. BMC ने भटक्या कुत्र्यांना रेबीज विरोधी लसीकरणासाठी एक मेगा मोहीम सुरू केली आहे, जी 15 मार्च 2026 पर्यंत चालेल.
या मोहिमेत स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था, निवासी संस्था आणि प्राणी पाळणाऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहनही बीएमसीने केले आहे.