शरीफ यांच्यावर निवडणूक लढवण्यावर आजीवन बंदी

सोमवार, 16 एप्रिल 2018 (15:42 IST)
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर निवडणूक लढवण्यावर आजीवन बंदी घालण्यात आलीय. पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टानं नवाज शरीफ यांच्यावर हे निर्बंध लादलेयत. त्यामुळे यापुढे कुठल्याही सार्वजनिक पदावर शरीफ विराजमान होऊ शकणार नाहीत. जनतेला स्वच्छ चारित्र्याचे नेते हवे आहेतत्यामुळेच हा निर्णय घेतल्याचं न्यायाधिशांच्या खंडपीठानं नमुद केलंय. गेल्याच वर्षी पनामा पेपर केसमध्ये सुप्रीम कोर्टानं शरीफ यांना पंतप्रधान पदासाठी अयोग्य ठरविण्यात आले आहे.
 

पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांच्यावर आजन्म निवडणूक बंदी लागू केलेय. त्यामुळे त्यांना आता देशात कोणतीच निवडणूक लढवता येणार नाही. दरम्यान, तीन वेळा देशाचे पंतप्रधानपद स्वीकारणाऱ्या नवाज यांचे राजकीय आयुष्य संपल्यात जमा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधिशांच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती