पनामा पेपर्स : बच्चन परिवाराकडून कागदपत्रे ईडीला साद

बॉलिवुड अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यांची पनामा पेपर्समध्ये नावे आली होती. यामुळे त्यांच्या पाठीमागे अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) चौकशी लागला आहे. त्यांनी मंगळवारी त्यांच्या काही आर्थिक व्यवहाराचे कागदपत्रे ईडीला सादर केले.
 
ईडीने अमिताभ बच्चन आणि त्याच्या सुनेला समन्स बजावून कागदपत्रे जमा करण्याचे आदेश दिले होते. पनामा पेपर्समध्ये ज्यांची नावे उघड झाली आहेत, अशा एकूण 33 जणांविरोधात आयकर विभागाने कारवाई सुरू केली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना या पनामा पेपर्समुळे आपले पद सोडावे लागले. आता भारतातही चौकशीने गती घेतली आहे. बॉलिवुड स्टारसह काही राजकीय नेते आणि बडे व्यापऱ्यांचाही यात समावेश आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती