शरीफ यांच्याविरोधात अटक वॉरंट

भष्ट्राचाराच्या आरोपांमुळे पंतप्रधानपद सोडावे लागलेले नवाज शरीफ यांना पाकिस्तानी न्यायलयाने जबरदस्त धक्का दिला आहे. न्यायालयासमोर हजर न झाल्याने न्यायाधीशांनी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
 
शरीफ हे सध्या लंडनमध्ये आहेत. तेथे त्यांच्या पत्नीवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर राहण्यापासून सूट देण्यात यावी, अशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली होती. मात्र, न्यायाधीश मोहम्मद बशी यांनी ही विनंती फेटाळत शरीफ यांच्याविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. तसेच 3 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार असून त्यावेळी त्यांनी न्यायलयात हजर राहावे, असे आदेशही दिले.
 
दरम्यान पुढील सुनावणी आधी शरीफ यांनी जामीन मिळवला नाही तर त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती