सध्या कोणताही उमेदवार नसतांना राज ठाकरे सपूर्ण राज्यात सभा घेत आहेत. यामध्ये ते मुद्देसूद भाषण करत आहेत. यामध्ये भाषण करतांना ते व्हिडियो दाखवतात, तेव्हा लाव रे तो व्हिडियो असे म्हणतात त्यामुळे ते सोशल मिडीयावर गाजत आहेत. तर त्यामुळे भाजपची सोशल मिडीया टीम चांगलीच अडचणीत आली आहे. त्यामुळे आता भाजपातील नेते मदतील आले असून राज ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत.
भाजपाचे नेते गिरीश महाजन म्हणाले की राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते, पण त्यांच्याकडे निवडून कुणीही येत नाही. राज यांच्या सभेनं करमणूक होते, पण रिझल्ट काय? असे म्हणत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज यांच्या सभांची खिल्ली उडवली आहे. नाशिक नगरपालिकेत त्यांची सत्ता होती, आता केवळ 2 नगरसेवक निवडून आले आहेत. यावरुन लक्षात येईल, केवळ बोलून चालत नाही, कर्तृत्वसुद्धा लागतं. राज ठाकरेंकडे फक्त एक आमदार होता, तोही त्यांना सोडून गेला. आता, लाव रे व्हीडिओ एवढच काम राज ठाकरेंना उरलंय. आपण कुठंय अन् बोलतो कुणाबद्दल, कुठे मोदीजी, कुठे सीएम, अशा शब्दात गरिश महाजन यांनी राज ठाकरेंच्या व्हीडिओवरील भाषणावर टीका केली आहे. ते क्लीप दाखवतात यातून लोकांची करमणूक होते. व्हीडिओबद्दल बोलायंच झालं तर, आम्हीही त्यांचे जुने व्हीडिओ काढून दाखवले तर? मोदींची स्तुती करताना राज ठाकरे थकत नव्हते. मग, आम्हीच प्रश्न विचारतो, एक माणूस एवढा बदलूच कसा शकतो? असे म्हणत गिरीश महाजन यांनी राज ठाकरेंच्या सभांचा समाचार घेतला आहे.