पवार यांनी 10 वर्षे केंद्रात असताना महाराष्ट्रासाठी काय केले हे सांगावे - अमित शहा

शनिवार, 20 एप्रिल 2019 (10:37 IST)
भाजपा अध्यक्ष महाराष्ट्रात प्रचार सभा घेत आहेत. त्यांची नुकतीच पुणे येथे सभा झाली. तेव्हा त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विकासावर फार बोलत आहेत. राज्याचे मोठे नेते आहेत. त्यांनी मुख्यमंत्री, कृषीमंत्री विविध पदांवर काम केले असून, 50 वर्षे सत्तेत राहण्याची कला फक्त त्यांच्याकडे आहे. मात्र, मोदी सरकारच्या जेव्हा ते 10 वर्षे केंद्रात होते तेव्हा महाराष्ट्रासाठी काय केले हे स्पष्ट करावे अशी विचारणा भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी प्रचार सभेत केलीआहे. 
 
शाह पुढे म्हणाले की, कॉंग्रेस आघाडीच्या पूर्ण काळात महाराष्ट्राला 1 लाख 15 हजार कोटी रुपये मिळाले, तर मोदींनी केवळ 5 वर्षांमध्ये 4 लाख 38 हजार 760 कोटी रुपये दिले आहेत. निवडणुका संपताच पुरंदर विमानतळाच्या कामालाही सुरुवात करणार आहोत. सोबतच मेक इन इंडियाच्या माध्यमातून नवीन गुंतवणूकहीहोणार आहे. शरद पवार यांनी बारामती, पुण्यासाठी काय केले हे आगोदर सांगावे. आता याबद्दल जनतेने देखील पवारांकडे हिशोब मागावा, असे आवाहन अमित शाह यांनी केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती