लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी उमेदवार याद्या करत आहेत. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र निवनिर्माण सेना अर्थात मनसेची अद्याप भूमिकाच गुलदस्त्यात आहे. अगोदर मनसे लोकसभा निवडणूक लढणार की नाही हेच कार्यकर्त्यांना स्पष्ट नाही. या कारणामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. दिनांक 19 मार्च रोजी हा मेळावा होणार असून, मेळाव्यात मनसे आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत.
मुंबईतील रंगशारदा सभागृह इथे मनसेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात मनसे निवडणूक लढणार की नाही, हे जाहीर करण्यात येणार आहे. राज ठाकरे आगोदर ९ मार्च रोजी बोलतील असे वाटले होते मात्र त्यांनी त्यांची भूमिका माडली नाही, आता लोकसभेची तयारी जोरदार सुरु असतांना मनसेचा कार्यकर्ता नेमके काय करायचा, कोणाला मतदान करायचे किंवा भूमिका घेवून कॉंग्रेस आघाडी की भाजपला मतदान करायचे याबदल साशंक आहे, त्यामुळे राज ठाकरे यांचा हा मेळावा महत्वाचा ठरणार आहे. या आगोदर विधानसभेतील एकमेव आमदार देखील मनसे सोडून शिवसेनेत गेला आहे त्यामुळे आता राज नेमका कोणता संदेश आणि पाठींबा देतात व उमेदवारी घोषित करतात याकडे कार्यकर्ते लक्ष देऊन आहेत.