पाणीच नाही मग आम्ही मतदान करयच कुणाला - पुणेकरांचा गिरीश बापट यांना प्रश्न

शनिवार, 20 एप्रिल 2019 (16:58 IST)
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात प्रचार आता अंतिम टप्प्यात असून, सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. सध्या छोट्या छोट्या सभा घेऊन उमेदवार नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हालाच मतदान करा असा, आग्रह करणाऱ्या उमेदवारांना आता नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र असून, याचा पहिला मोठा फटका पुण्यात भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना बसला आहे. मागील पाच वर्षे पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहणारे पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना पुणेकरांच्या रोषाला सामोरे जावे लागले. बापट पुण्यातल्या कॅम्प परिसरात प्रचार करत होते, यावेळी जमलेल्या नागरिकांनी बापट यांना पाणी प्रश्नावरून चांगलंच घेरलं होते. 
 
आम्ही पाण्यासाठी गेले कित्येक दिवस, महिने झगडतो आहोत अर्ज देत आहोत मात्र कोणतीच कारवाई होत नाही, आमच्या परिसरात आम्हाला पाणीच मिळत नाही, पुणे स्मार्ट शहर होतय तरी हे प्रश्न आहेत, मग  आता आम्ही मतदान का करावे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. परिसरामध्ये बापट पाणी पुरवू शकले नाहीत असा आरोप नागरिकांनी केला. तसेच, आता आम्हाला तर पाणीच मिळत नसेल तर आम्ही मतदान का करावे असा थेट प्रश्नच नागरिकांनी बापटांना तोंडावर विचारला आहे. नागरिकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गिरीश बापट गोंधळून गेले होते. नागरिकांना नक्की काय उत्तर द्यावे असा प्रश्न त्यांना पडला आणि त्यांनी थातूरमातूर उत्तर देत नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे येथे अनेक दिवसांपासून पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे, या आगोदर देखील अनेक प्रकारे पुण्यातील लोकांनी आपला राग व्यक्त केला आहे. मात्र आता निवडणुकीच्या तोडावर सुद्धा प्रश्न बाकी आहेत त्यामुळे हा पाण्याचा प्रश्न मोठा मुद्द्दा होणार आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती