पुण्यात तरुणावर अॅसिड हल्ला, पोलिसांवर गोळीबार नंतर हल्लेखोराने केली आत्महत्या

बुधवार, 17 एप्रिल 2019 (09:22 IST)
पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या परिसरात एका अज्ञात व्यक्तीने 23 वर्षीय तरुणावर अॅसिड हल्ला केला. या अॅसिड हल्ल्यानंतर आरोपीने पोलिसांवरही गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या अॅसिड हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजता घडला असून त्यानंतर दुस-याने त्याच्यावर  गोळीबार करण्यात आला.हल्लेखोराने आधी एका तरुणावर अ‍ॅसिड फेकले आणि पोलिसांवर गोळीबार करून पळ काढला. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
 
 रोहित विजय थोरात (वय २५, रा़ सदाशिव पेठ) असे या तरुणाचे नाव आहे़ या अ‍ॅसिड हल्ल्यात त्याचा चेहरा आणि मान भाजली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेला तरुण पुण्यातील टिळक रोडवर एका मैत्रिणीसोबत बोलत थांबला होता. अचानक एका अज्ञात व्यक्तीने तरुणाच्या तोंडावर आणि पाठीवर अॅसिड फेकले. यानंतर तरुणाच्या मैत्रिणीने आरडाओरड केली. यानंतर घाबरलेल्या आरोपीने पोलिसांवर बंदुकीने गोळीबार केला.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी थोरात याला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविले. त्याचवेळी गोळीबार करण्यासाठी तो गेलेल्या इमारतीमध्ये पोलिसांनी जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. पोलीस आणि हल्लेखोरामध्ये जवळपास 2 तास धुमश्चक्री उडाली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवानही पोहोचले. तब्बल दोन तासांच्या धुमश्चक्रीनंतर त्याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तो अपयशी ठरला. त्यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र, हा हल्ला नेमका कशासाठी आणि का करण्यात आला होता. या पोलीस तपास करत आहे.  विश्रांतीबाग पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. या घटनेमुळे पुणे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून हा हल्ला प्रेम प्रकरणातून झाला असे प्राथमिक तपासत समोर आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती