पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हेमंत पवार आणि आकाश वाघमारे हे दोघे मांडूळ विकणार असून ते ग्राहकाच्या शोधात आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस शिपाई मालुसरे यांनी या दोघांशी ग्राहक म्हणून संपर्क साधला. चार लाख रुपयांमध्ये मांडुळाचा व्यवहार ठरला. मालुसरे यांना या दोघांना नाशिक-पुणे महामार्गावरच्या मोशी या ठिकाणी बोलावले. ठरल्यानुसार मालुसरे ग्राहक बनून या दोघांना भेटण्यासाठी गेले. तिथे हे दोघे येताच सापळा रचून पोलिसांनी त्यांना अटक केली.