ही दोन भुयारं कधी आणि कोणी , कोणत्या साली बांधली याची अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. स्वारगेट परिसरातील राजर्षी शाहू महाराज बस स्थानकाच्या समोरील बाजूला पायलिंग मशीनद्वारे खोदकाम सुरु आहे, त्याचवेळी बस स्थानकाची बाजू खचली आणि असाच खड्डा त्याच्या दुसऱ्या बाजूला घेत असताना तेथेही मोठा खड्डा पडला.
त्यानंतर मेट्रोच्या अधिकाऱ्यांना पाहणी केली तर त्यात पूर्व, पश्चिम दिशेसह उत्तरेकडे भुयार जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकारे जमिनीखाली भुयारं सापडण्याची उदाहणं इतर ठिकाणीही देखील पाहायला मिळालेली आहेत. त्यातील अनेक भुयारं ही अनेक वर्षांपूर्वी बांधली आहेत.