चार टप्प्यातल्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सजग नागरिकांनो, आधी मतदान करून मगच लुटा सुट्टीचा आनंद, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. मतदारांनो, ऐका हो ऐका. पाच वर्षांनी मिळणार संधी. संधी जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीउत्सवात सहभागी होण्याची आहे.
संधी तुमचा राजा ठरवण्याची आहे. ही संधी वाया घालवू नका. मतदारांनी मतदान करावं म्हणून राज्यात ११ एप्रिल १८ एप्रिल, २३ एप्रिल आणि २९ एप्रिलला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अर्थात चारही दिवस सरसकट सुट्टी नाही. तर ज्या दिवशी मतदान आहे, त्या भागात फक्त त्या दिवशीच सुट्टी मिळणार आहे.